Monday, September 21, 2009

खरच का एवढ्या सहज...

(आज रात्री)
असच कधीतरी मनात आलीये, एक छोटीशी कल्पना
आकाशाला साद घालण्याची तिची केवढी ही वल्गना
हे दोन-चार क्षण केवढ केवढ छान वाटलय...
खूप काही मनामध्ये काठोकाठ दाटलय
कसाही वेळ काढून आज लिहुयाच चार ओळी
सडा घालून आन्गणामध्ये कधी काढावी रांगोळी
log in करताना मात्र नेमका कामाचा मेल आला असतो
खरच का एवढ्या सहज आपण एखादा विचार हरवून टाकतो...

(मागच्या कुठल्यातरी आठवाड्यात)
आईशप्पथ..! केवढा भरी लिहितो हा... खूप खूप आवडलय
नकळत त्यानी मलादेखील स्वतःमध्ये ओढून घेतलय
काय लिहू रिप्लाय... काहीच सुचत नाहीये
'खूप छान' फक्त एवढच लिहीणसुद्धा पटत नाहीये
जाऊ दे... पुन्हा एकदा वाचून नंतर मस्तपैकी comment लिहीन...
मी ठरवून टाकतो
खरच का एवढ्या सहज आपण स्वतःमधून निसटून जातो

(आज रात्री उशीरा)
उशीर झालाय, झोप येतेय, नाही... आज लिहायचच
थोड तरी स्वतः आज स्वतःशीच बोलायचच
खूप दिवस झाले नाही मागची post टाकल्यानंतर
केवढे दिवस होतो स्वतः स्वतःशीच समांतर
वाचत का पण कुणी असल काही... comment तर कुठली दिसत नाहीये
बोअरही झालय आत्ता, विचार करावासा वाटत नाहीये
शनिवारी रात्री... नाही.. उद्या... उद्या मी नक्की लवकर घरी येतो
खरच का एवढ्या सहज... एखादा ब्लॉग मरून जातो.....