२. त्याच कप्प्यात एक १०० पानी, पुट्ठ्याची, 'सुपर डीलक्स' वही मिळाली. पहिल्या पानावर होत:
परिमेय संख्या
खालिल परिमेय संख्यांचे अंश व छेद लिहा. वगैरे...
आणि शेवटच्या पानांवर बऱ्याच कविता होत्या. त्यातली एक --
एकटा
मी इथे फक्त एकटा आहे.
ना आकाश, ना प्रकाश, ना अंधार, ना आधार
कुठल्याही झाडाच कुठलही पान
इथं सळसळत नाही
कुठल्याही बिलातल कुठलही गांडूळ
इथं वळवळत नाही
इथल्या शांततेला अस्तित्व नाही
आणि इथलं अस्तित्व अशांत आहे
वारा तरी इथे कधी येतो का? माहित नाही
पण तरीसुद्धा डोळ्यांतली आसवं वाळतात
आणि उन्ह तर इकडे कधीच येत नाही
कारण माझ्या सावलीशी त्याच वाकड़ आहे
पाउस... हं... इथल्या आकाशात ढगच नाहीत
वर पाहिल्यावर आकाश तरी कुठे दिसतं
बहुतेक ते नाहीचे इथे... केवळ भास... क्षितिजासारखा
मग तरीही मी इथे काय करतोय ?
की... कदाचित....
मी अजिबातच एकटा नाहीये इथं
कानाला जाणवणारही नाही, इतक्या
हलुवारपणे सळसळणारी इथली पानं
अन बेमालूमपणे माझी आसवं टिपणारा
इथला वारा
अस्तित्वहीन वाटणारी पण
क्षणोक्षणी माझ अस्तित्व पटवणारी
इथली निशब्द शांतता
आणि असीम शांत असलेला इथलं
अ-शांत अस्तित्व
बरोबर डोक्यावर पडणार आणि माझ्या सावलीला
सतत माझ्या नकळत माझ्या बरोबर ठेवणार
इथलं निरागस उन्ह
पटकन जाणवतही नाही
इतकं नितळ... इथलं आभाळ
आणि माझ्या इवल्या नजरे पलिकड़च
इथलं क्षितिज... विस्तृत, विशाल
माझ्या मनातलं मळभ घालवण्यासाठी
आसवांचा पाउस पाडणारे... इथले अदृश्य ढग
निरंतर, निराकारपणे गतिशील असलेला
इथला निशब्द, निर्गुण काळ
मी इथे काय करतोय ?
कदाचित... मी इथे एकाटेपणच शोधतोय
इथं अजिबात नसलेलं !
Thursday, December 31, 2009
Wednesday, December 30, 2009
काही कविता... हरवलेल्या...
१. घरी वेळ जात नव्हता. म्हणून पुस्तकांचा एक कप्पा आवरायला घेतला. त्यात एक डायरी मिळाली. जिच्या पहिल्या पानावर, वाकड्या तिकड्या अक्षरात, उंची ४.८ अणि वजन २६ लिहिल होत. डायरी संपूर्ण कोरी होती. एक्सेप्ट शेवटच पान...
पुन्हा एकदा सापडलेल्या डायरीतली कविता...
संपूर्ण डायरी कोरी, शेवटी पान भरलेले
निर्बंध मोकळी पाने, शेवटी बंध जुळलेले
एखाद्या संध्याकाळी...
ना मेघ दाटलेले,
ना पश्चिम रंग बहरले,
ना वारा पिसाट सुटला,
ना माती अत्तर उधळे.
परी मनी मेघ दाटती,
उठती स्वप्नांचे बहुरंग
मन सैरावैरा पळते,
मन मनात त्याच्या दंग.
नकळत कशी पण तेव्हा, ती जूनी डायरी मिळते
मोकळ्या आणि त्या पिवळ्या, पानातून संध्या हसते...
पुन्हा एकदा सापडलेल्या डायरीतली कविता...
संपूर्ण डायरी कोरी, शेवटी पान भरलेले
निर्बंध मोकळी पाने, शेवटी बंध जुळलेले
एखाद्या संध्याकाळी...
ना मेघ दाटलेले,
ना पश्चिम रंग बहरले,
ना वारा पिसाट सुटला,
ना माती अत्तर उधळे.
परी मनी मेघ दाटती,
उठती स्वप्नांचे बहुरंग
मन सैरावैरा पळते,
मन मनात त्याच्या दंग.
नकळत कशी पण तेव्हा, ती जूनी डायरी मिळते
मोकळ्या आणि त्या पिवळ्या, पानातून संध्या हसते...
Subscribe to:
Posts (Atom)