Wednesday, December 30, 2009

काही कविता... हरवलेल्या...

१. घरी वेळ जात नव्हता. म्हणून पुस्तकांचा एक कप्पा आवरायला घेतला. त्यात एक डायरी मिळाली. जिच्या पहिल्या पानावर, वाकड्या तिकड्या अक्षरात, उंची ४.८ अणि वजन २६ लिहिल होत. डायरी संपूर्ण कोरी होती. एक्सेप्ट शेवटच पान...

पुन्हा एकदा सापडलेल्या डायरीतली कविता...

संपूर्ण डायरी कोरी, शेवटी पान भरलेले
निर्बंध मोकळी पाने, शेवटी बंध जुळलेले

एखाद्या संध्याकाळी...

ना मेघ दाटलेले,
ना पश्चिम रंग बहरले,
ना वारा पिसाट सुटला,
ना माती अत्तर उधळे.


परी मनी मेघ दाटती,
उठती स्वप्नांचे बहुरंग
मन सैरावैरा पळते,
मन मनात त्याच्या दंग.


नकळत कशी पण तेव्हा, ती जूनी डायरी मिळते
मोकळ्या आणि त्या पिवळ्या, पानातून संध्या हसते...

No comments:

Post a Comment