(मला आत्तापर्यंत मिळालेली सर्वांत सुंदर भेट ! इन्जिनिअरिन्गच्या शेवटी माझ्या मित्रानी, मोहितनी, दिलेली. मला मान्य आहे कि, तुला Thank you म्हटलं पाहिजे. पण खरं सांगू का, ही भेट त्याच्या फार पलीकडची आहे मोहित !!!)
तुम्ही पाहिलं असेल कुणाला दारू चढताना,
कुणाला भांग चढताना,
अहो कुणाला सिगरेटही चढताना . . .
पण आमच्या स्वानंदला ना 'संध्याकाळ' चढते !
चढता चढता संध्याकाळ एक सुंदर रात्र होते
काठोकाठ भरलेलं मद्याचं पात्रं होते . . .
पात्र म्हणजे ?
अहो, पात्र म्हणजे काचेचा सुंदर निमुळता ग्लास
मग स्वान्ड्या ती संध्याकाळ हळूहळू पितो
अन वागतो एकदम झक्कास
सकाळी स्वानंद एकदम सिरीयस, शांत, सालस
लेखक वाटतो
पण संध्याकाळी अवखळपणा त्याच्या अंगाखांद्यावर
नाचतो
मग स्वान्ड्या उडतो काय ? हसतो काय ?
रडतो काय ? खेचतो काय ?
म्युझिक मिळालं की हलवतो आपले बारीक बारीक
हात पाय . . .
आता तर एकच घोट पिऊन झालेली असते 'संध्याकाळ'
मग स्वान्ड्या मस्तपैकी pillar ला रेलून उभा राहतो
अन ऐटीत आणखी एक घोट घेतो
मग ग्लास असा प्रकाशात उंचावत ,
किती उरलीये संध्याकाळ ते बघून घेतो . . .
अजून संध्याकाळ बरीच उरली असते
पण तिला रात्रीची कविता स्फुरली असते
मग तिलाही प्रश्न पडतो, कवि कोण ?
स्वानंद की . . . . . .
असो . . .
दारूत सोडा टाकावा ना तशी हळूच रात्र त्या
ग्लासात पडते
पण कसय, सोड्यानी जरा नशा कमी होते
पण... रात्र पडली ना, कि जरा लवकर चढते
मग स्वानंद गाणी गातो . . . विचित्र गाणी . . .
स्वानंदी स्वानंद कढे . . . वगैरे . . . वगैरे . . .
लोकांना नाही झेपत, पण तो संध्याकाळ पिऊन
स्वानंद घेत असतो . . . . . .
असाच स्वानंद चालत रहातो रात्रभर . . .
संध्याकाळच्या सोबतीला . . .
अन मग संपते संध्याकाळ . . . पण
स्वानंद ठेऊन देतो दोन थेंब त्या ग्लासात
फक्त उद्याच्या आठवणीसाठी . . . . . .
-- मोहित
तुम्ही पाहिलं असेल कुणाला दारू चढताना,
कुणाला भांग चढताना,
अहो कुणाला सिगरेटही चढताना . . .
पण आमच्या स्वानंदला ना 'संध्याकाळ' चढते !
चढता चढता संध्याकाळ एक सुंदर रात्र होते
काठोकाठ भरलेलं मद्याचं पात्रं होते . . .
पात्र म्हणजे ?
अहो, पात्र म्हणजे काचेचा सुंदर निमुळता ग्लास
मग स्वान्ड्या ती संध्याकाळ हळूहळू पितो
अन वागतो एकदम झक्कास
सकाळी स्वानंद एकदम सिरीयस, शांत, सालस
लेखक वाटतो
पण संध्याकाळी अवखळपणा त्याच्या अंगाखांद्यावर
नाचतो
मग स्वान्ड्या उडतो काय ? हसतो काय ?
रडतो काय ? खेचतो काय ?
म्युझिक मिळालं की हलवतो आपले बारीक बारीक
हात पाय . . .
आता तर एकच घोट पिऊन झालेली असते 'संध्याकाळ'
मग स्वान्ड्या मस्तपैकी pillar ला रेलून उभा राहतो
अन ऐटीत आणखी एक घोट घेतो
मग ग्लास असा प्रकाशात उंचावत ,
किती उरलीये संध्याकाळ ते बघून घेतो . . .
अजून संध्याकाळ बरीच उरली असते
पण तिला रात्रीची कविता स्फुरली असते
मग तिलाही प्रश्न पडतो, कवि कोण ?
स्वानंद की . . . . . .
असो . . .
दारूत सोडा टाकावा ना तशी हळूच रात्र त्या
ग्लासात पडते
पण कसय, सोड्यानी जरा नशा कमी होते
पण... रात्र पडली ना, कि जरा लवकर चढते
मग स्वानंद गाणी गातो . . . विचित्र गाणी . . .
स्वानंदी स्वानंद कढे . . . वगैरे . . . वगैरे . . .
लोकांना नाही झेपत, पण तो संध्याकाळ पिऊन
स्वानंद घेत असतो . . . . . .
असाच स्वानंद चालत रहातो रात्रभर . . .
संध्याकाळच्या सोबतीला . . .
अन मग संपते संध्याकाळ . . . पण
स्वानंद ठेऊन देतो दोन थेंब त्या ग्लासात
फक्त उद्याच्या आठवणीसाठी . . . . . .
-- मोहित
aye ! मी ऐकलिये ही मोहित कडूनच ! कसली जमलेली कविता आहे अरे ही ... तेंव्हा पण लई आवडलेली..:)
ReplyDeleteBhannatch!
ReplyDeleteही कविता लय भारी आहे...!!! आणि मोहित कडून ऐकायला मिळणे खूपच भारी होतं... :)
ReplyDeleteस्वान्ड्या, केवढं प्रेम मिळालंय तुला लोकांचं!!! वा!वा!
ReplyDelete@मोहित, कविता खूपच सुंदर झालीय. इतकं सुंदर चाळीस एक ओळींत!!!
@Barkya - lakh bolalas.... lokancha khoop prem milalay mala, ani I hope asach milat rahil...!!!!!! :)
ReplyDelete