Friday, December 28, 2018

किती?

आत आहे खूप काही साठलेले, 
सरले किती? भरले किती?

शुभ्र आहे खोल काही दाटलेले, 
विरले किती? पांघरले किती?

भावनांचे रंग होते आसवांनी ओढलेले, 
विरघळले किती? पाझरले किती?

अंतरीच्या चेतनांनी दीप होते लावलेले, 
काजळले किती? लखलखले किती?

थोर होते कविते तुझ्याशी बोलणारे,
अवतरले किती? घडले किती?

तू सांग केवळ वाचणारेही आता,
उरले किती? उरले किती? 

3 comments:

  1. आम्ही आहोत वाचणारे, जाणणारे, लिहीणारे

    ReplyDelete
  2. आता उरलो केवळ प्रतिसादापुरता ;)

    ReplyDelete