मनात माझ्या स्पंदनांचा ललकार होता
नकार कि, तुझा सये तो... होकार होता ?
असायचो कितीकदा त्या, गर्दीतही मी एकटा
काल एकांतातही का, सखे तुझा, आधार होता ?
मनातली प्रत्येक माझ्या, व्यथा मला, तुझ्यात दिसली,
काल का इतुका तुझा, चेहेरा सखे, निर्विकार होता ?
भासली आसवेही माझी, खळीत तुझिया, मोत्यांपरी
काल का, वेड्या कळीला, इवल्या दवाचा भार होता ?
हसणे तुझे कि, स्फुरायचा तो, खळाळता झरा इथे
काल स्मितहास्याताही का, सळाळता ध्रोंकार होता ?
ढळायचा अश्रू तुझा अन, चूक माझी उमगायचो मी
काल का मग एवढा, हुंदका हळुवार होता ?
अनेकदा सुरांत माझ्या, वाहिलेस तू स्वतःला
काल का भैरवीत माझ्या, श्वास तुझा, गंधार होता ?
असायचो सम्राट मी अन, शब्द तुजला, सुनवायचो मी
गुलाम झालो काल पुरता, कविते तुझा दरबार होता !
तुझ्यामुळे अस्तित्व माझे, नाही तुला, पुसायचे मी
कळवायचा कवीनेच त्याचा, कविते तुला, होकार होता !

sundar!!!
ReplyDeleteखूप सुंदर स्वान्ड्या.....
ReplyDeleteविशेषकरून
"भासली आसवेही माझी, खळीत तुझिया, मोत्यांपरी
काल का, वेड्या कळीला, इवल्या दवाचा भार होता ?
हसणे तुझे कि, स्फुरायचा तो, खळाळता झरा इथे
काल स्मितहास्याताही का, सळाळता ध्रोंकार होता ?"
अप्रतिम आहे.
पण एक गोष्ट मला जाणवली की कवितेतली सौन्दर्यस्थाने खूप सुंदर असली तरी गझल जर वृत्तात असती तर आणखी सुंदर वाटली असती.