लपले आहे,
मनात काही खोल, गुढसे;
विचार कोणता डोकाविल,
त्याचे टाकित फासे...
विचार-वादळ भयाण जेव्हा,
मनात उठते;
केंद्र तयाचे तिथेच कोठे,
दडले असते.
अनाम कुणास्तव,
मनास जेव्हा हुरहूर वाटे;
मृदगंधापरी सुगंध सुंदर,
तिथेच दाटे.
भडकुनी वणवा रागाचा,
मन लाही जेव्हा होते;
पेटविणारी ठिणगी पहिली,
तिथेच पडली असते.
हात कुणाचा आहे हाती,
भासे जेव्हा;
उमले सुंदर कळी चिमुकली,
तिथेच तेव्हा.
मनास पुसले,
"सांग मना,
हे गूढ कोणते?"
वदले मन, "हे,
गूढ निरंतन,
तुझ्याप्रमाणे,
स्वतः स्वतःचा,
शोध घेते ! "
wah! best kalpana! aani sundar kavita
ReplyDeleteGudh kavita :) ...very nice poem...The poem befits you :)
ReplyDeleteस्वान्ड्या, सुंदर कविता झाली आहे. पूर्ण कळली नाही, पण जेवढं कळलंय तेवढं छान वाटतं.
ReplyDelete