Wednesday, September 28, 2011

स्वान्ड्यारावांची PhD

(माझ्या पासपोर्ट मिळवण्याच्या अन नंतरच्या PhD application च्या काळात मी सर्वात जास्त जर कुठल्या मित्राकडे रडलो असेन, तर तो अभ्या (अभिषेक) काकडे (उर्फ चोच्या). पठ्ठ्यानी तेव्हा माझं सगळं ऐकून घेऊन, मित्रधर्म पाळला. पण नंतर मात्र त्यानी, या सगळ्या 'प्रकरणा'वरून माझी खेचायचा एकही chance सोडलेला नाही. (थोडक्यात, अजूनही तो मित्रधर्म पाळतोय :) )
तर, या सगळ्या 'भानगडी'वर काहीतरी लिही, असं त्यानी मला हज्जारदा सांगूनही मी अजून तरी काही लिहिलेलं नाहीये. कारण काहीही असो - काही विशेष अंगभूत 'गुणांचा' (जसे, आळस) प्रभाव म्हणा किंवा स्वतःच्या गंडण्याकडे तिऱ्हाईतपणे पाहण्यासाठी लागणाऱ्या मोठेपणाचा अभाव म्हणा. पण आमचे अभ्याराव बाकी जिद्दी आणि हुशार. जिद्दी यासाठी की आमच्या 'कर्तृत्वावर' काहीतरी लिहिलं जावं यासाठीचे प्रयत्न त्यानी सोडले नाहीत. आणि हुशार यासाठी की स्वतः लिहिण्याच्या फंदात काही तो पडला नाही. पण त्यानी माझे सगळे पराक्रम त्याच्या मैत्रिणीला - त्रिपुराला - सांगितले, आणि तिनी चक्क त्यावर एक झक्कास कविता लिहिली! आता अभ्याला Thank you म्हणायला, माझी शौर्यगाथा कथन करण्यामागचे त्याचे विचार फार स्वच्छ होते असं काही मला वाटत नाही :) पण केवळ त्यानी केलेल्या वर्णनावरून - जे किती भयानक असेल हे मी imagine करू शकतो - इतकी सुंदर कविता केल्याबद्दल त्रिपुराला खूप खूप धन्यवाद...!!! )

स्वान्ड्यारावांची PhD

M. Tech. ची धांदल संपता संपताच,
पुढच्या degreeची लागली हाव...
परदेशी जाऊनच करीन PhD,
ठरवून बसले आमचे स्वान्ड्याराव !

केला अर्ज मग पासपोर्टसाठी,
पाहिला टाकून पहिला डाव...
५०,००० तही मिळेना पासपोर्ट तरीही,
भरत राहिले ब्यागा स्वान्ड्याराव !

चालवली घरे वकिल, जज्जांची,
वेळोवेळी घेतली कोर्टात धाव...
थोपटून आपले दंड पोलादी,
PhD साठी राहिले लढतच स्वान्ड्याराव !

ऐटीत दिली पार्टी सांगत,
पुढल्यावेळी असेल नवा गाव...
या वेळीही म्हणू सगळे तसंच,
पार्टी मात्र द्या ... स्वान्ड्याराव !

आभ्या, विशल्या पोचले U.K. त,
बारक्याला मिळाला गडचिरोलीत भाव...
G.R.E. मध्ये काढूनही स्कोर मजबूत,
राहिले बघत वाट स्वान्ड्याराव !

कुठूनही यावा एकदाचा call,
university चे नसेना ऐकीवात नाव...
प्रार्थना शनीला आम्हा पामरांची,
PhD ला जावे आमचे स्वान्ड्याराव !

- त्रिपुरा





8 comments:

  1. :) छान आहे... पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...!!! :)

    ReplyDelete
  2. कविता छान आहे :) तुझा Paragraph 'बेस्ट' आहे !! Hilarious !

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. Tula kavita appreciate zali, mala khoop bara vatala! Thanks to you too, ki itka chhan response dilas!!

    Tripura,
    http://www.bhaavsparsh.blogspot.com/

    ReplyDelete
  5. mast ahe re kavita...ani para hi..

    ReplyDelete
  6. स्वन्ड्याराव ... एक चांगली कविता हजार उपरोधिक कवितांना निष्प्रभ करू शकते :)

    @ त्रिपुरा: तू मस्त कविता करतेस हे ऐकले होते... ऐकीव माहितीवरून लय भारी कविता केली आहेस...

    ReplyDelete