धगधगत्या दुपारी, वाऱ्याच्या झुळुकेची वाट बघत
एका निश्चल तळ्याच्या काठावर बसलो होतो. . .
पाण्यामध्ये दगड टाकला. . . . . . . . . तरंग उठले. . .
कसल्याशा आवाजानं त्या अजस्त्र शांततेला, क्षणभर नाकारलं;
पाण्यातलं आकाशाचं विस्तीर्ण चित्र, असंख्य तुकड्यात विखुरलं
पिंपळावरचा पारवा फडफडत उडत गेला, झाड सळसळलं;
पिकलं पान गळलं एक, झाड वेडं हळहळलं
पिकलं पान हळुवार पाण्यावरती उतरलं;
उमटलेल्या त्या तरंगांवर, पान थोडं हेलकावलं
. . . . . . . . . तरंग विरले. . .
दोन क्षण चार गोष्टी, सारं पुन्हा स्तब्ध स्तब्ध
अचल वारा निश्चल पाणी, सारं थोडं क्षुब्ध क्षुब्ध
पुन्हा एकदा पाण्यामध्ये दगड टाकला. . . . . . . . . तरंग उठले !
उमटलेल्या त्या तरंगांवर, पान पुन्हा हेलकावलं. . .
आता ते अलगद परत येईल, काठावरच्या झाडाला वेडी आस;
ते नक्की परत येईल, माझ्या खुळ्या मनाला पक्का विश्वास
तरंग !!! पाण्याची वरखाली होणारी हालचाल
गतिमान होण्याचा फक्त आभास. . .

Jaam bhari ,tu Ved ahes swandya :)
ReplyDeleteIncredibly Awesome!!
ReplyDeleteBhari swandya.........!!!!!
ReplyDeleteतरंग !!! पाण्याची वरखाली होणारी हालचाल
ReplyDeleteगतिमान होण्याचा फक्त आभास. .
zakaas!