Wednesday, September 4, 2013

डोंगर आणि ढग




आकाशातले भले मोठ्ठे ढग,
कधी अचानक खाली येतात… 
उंच एकट्या डोंगराशी,
हळूच गप्पा मारू लागतात… 

उंच उंच डोंगरावरची,
उंच उंच झाडं… 
भल्या थोरल्या ढगांसमोर,
इवली इवली झाडं… 

सळसळणाऱ्या पानांमधून,
झाडं गलका करू लागतात… 
उधाणलेल्या वाऱ्यासंगे,
ढगांकडे हट्ट धरतात… 

फांदीवरचा उनाड कोकीळ,
हिरवं गाणं लिहू लागतो…      
बांबूंमध्ये घुमत वारा,
दडले सूर शोधू पाहतो… 

दूर दरीत कोसळणाऱ्या पावसाच्या सरी,
मग डोंगराकडे धावत येतात… 
अन थेंबांचा ठेका धरत,
मोहरणारे सूर जुळतात…!!   

5 comments:

  1. मस्त!
    डोंगर आणि ढग यांचे नाते अतूट . सह्याद्री मधे फिरताना अनेकदा आलेले अनुभव या ओळी वाचून डोळ्यासमोर उभे राहतात .

    ReplyDelete
  2. Genious !!!!....Khupaaaccchhh BHAriiiiiii !!!

    Khup awadli kavita Swandya :-)

    ReplyDelete