नभाच्या किनारी, सप्तरंगी निखारे
नभाच्या मनी, दाटले दुःख सारे
अलवार किरणांतुनी, सांजवेळी
हळुवार नभ हे, भुईला विचारे
"अथांग का मी? का एकटा?
का वाटते हे, असे बावरे ?
पडती मला का, असे प्रश्न ज्यांची
नसती कुणा, माहिती उत्तरे"
थांबून थोडे, धरा गोड हसते
म्हणते "नभा, जरा थांब ना रे"
"होईल जेव्हा, किर्र अंधार तेव्हा
पुसतील दुरुनी तुला, चांदण्या रे
होईल तेव्हा, जग एकले अन
तुझ्या अंगणी शुभ्र, फुलतील तारे!"
No comments:
Post a Comment