Wednesday, June 12, 2013

मौन

शब्दांत सखे या, मौन तुला गवसावे
नभ भरलेले परी, निरभ्र तुज भासावे

वाळूवर उठली, असंख्य पाऊलचिन्हे
लाटांनी त्यांना, अंतरात ओढावे

पाण्यात तळ्याच्या, कित्येक पहुडल्या प्रतिमा
वेड्या तीरीपेने, सारे सोनेरी व्हावे

मी पिसासारखा, दिशाहीन उडताना
तू अलगद मजला, मुठीत ओढून  घ्यावे 

4 comments:

  1. क्षितिजाच्या पल्याड शब्दही मावळताना
    तू कवितेसही या, मौनात लिहुनी जावे. . .

    ReplyDelete
  2. Shevatchya 2 Oli tar Genius !!! :-) :-)

    ReplyDelete